पोशिंद्याला मानसिक व व्यावहारिक आधार देणे काळाची गरज - सपोनि (नि.) नामदेव चव्हाण
छत्रपती संभाजीनगर, 04 जानेवारी (हिं.स.)। शेतकरी आज स्वतःच सुरक्षित नाही अशी गंभीर परिस्थिती त्वरित बदलणे अत्यावश्यक आहे. शासनाने ठोस पावले उचलून पोशिंद्याला मानसिक व व्यावहारिक आधार देणे ही काळाची गरज आहे. शेतकरी विजेच्या अभावामुळे व वन्यप्राण्यां
पोशिंद्याला मानसिक व व्यावहारिक आधार देणे काळाची गरज - सपोनि (नि.) नामदेव चव्हाण


छत्रपती संभाजीनगर, 04 जानेवारी (हिं.स.)। शेतकरी आज स्वतःच सुरक्षित नाही अशी गंभीर परिस्थिती त्वरित बदलणे अत्यावश्यक आहे. शासनाने ठोस पावले उचलून पोशिंद्याला मानसिक व व्यावहारिक आधार देणे ही काळाची गरज आहे. शेतकरी विजेच्या अभावामुळे व वन्यप्राण्यांच्या (विशेषतः बिबट्या) दहशतीमुळे त्रस्त झाला आहे. या समस्येला वेळीच तोडगा निघावा, या हेतूने सेवानिवृत्त पोलिस निरीक्षक नामदेव चव्हाण यांनी पुढाकार घेतला आहे.

अध्यक्ष भरत राठोड, उपाध्यक्ष नामदेव चव्हाण, महावितरण ग्रामीण विभागाचे अधीक्षक अभियंता संदीप दरवडे तसेच प्रादेशिक वनविभागाच्या उपवनसंरक्षक सुवर्णा माने यांची छत्रपती संभाजीनगर येथे भेट घेऊन शेतकऱ्यांच्या समस्या मांडण्यात आल्या.

शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळेस पिकांना पाणी देण्यासाठी जीवाची पर्वा न करता शेतीसाठी जावे लागतेः परंतु बिबट्याची भीती इतकी वाढली आहे की हिम्मत असूनही ती खचते, असे यावेळी सांगण्यात आले. संबंधित अधिकाऱ्यांनी आवश्यक त्या सहकार्याचे आश्वासन दिले.

नामदेव चव्हाण म्हणाले की, नोकरीच्या काळात गाव, आई-वडील, मित्र, नातेवाईक यांना दूर ठेवत सेवा केली. निवृत्तीनंतर वडिलोपार्जित भूमीत राहावे, आई-वडिलांसोबत वेळ घालवावा, थोडीफार शेती करावीष्ठ या भावनेने गावी आलो. पण गावाची परिस्थिती आज पूर्णपणे बदलली आहे. बिबट्याच्या दहशतीमुळे रोजंदारी मिळत नाही, मिळाली तरी मोटारसायकल शेतावर सोडावी लागतेः संध्याकाळी ५ वाजेपर्यंत घरी पोहोचवतात. शेतकरी अडचणीत तत्काळ उपाययोजना आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

-------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande