
परभणी, 04 जानेवारी (हिं.स.)।
पाथरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश विटेकर यांनी
मानवत येथे उद्या आयोजित करण्यात येणाऱ्या इज्तिमा कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर आज कार्यक्रम स्थळाची पाहणी केली. यावेळी आयोजकांशी संवाद साधत कार्यक्रमाची रूपरेषा, नियोजन व आवश्यक तयारीची सविस्तर माहिती घेतली.
इज्तिमा हा केवळ धार्मिक कार्यक्रम नसून, आत्मशुद्धी, संयम, बंधुता व मानवतेचा संदेश देणारा पवित्र सोहळा आहे. समाजात शांतता, सद्भावना व परस्पर आदर वाढवण्याचे कार्य इज्तिमाच्या माध्यमातून घडते. हा पवित्र कार्यक्रम यशस्वी व मंगलमय व्हावा आणि मानवत परिसरात सौहार्दाचे वातावरण निर्माण व्हावे, याच सदिच्छा आमदार विटेकर यांनी व्यक्त केल्या.
यावेळी नगरपरिषदेचे गटनेते डॉ. अंकुश लाड, मार्केट कमेटीचे सभापती पंकज आंबेगावकर, प.स. माजी सभापती गंगाधरराव कदम, सरपंच संतोषराव लाडाने, दत्तात्रय जाधव यांच्यासह नगरसेवक युवक सहकारी व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis