परभणी - तारू गव्हाण येथे पांदण रस्त्याच्या खडीकरण कामाचे भूमिपूजन
परभणी, 4 जानेवारी, (हिं.स.)। पाथरी तालुक्यातील मौजे तारू गव्हाण येथे १ किलोमीटर पांदण रस्त्याच्या खडीकरण कामाचे भूमिपूजन पाथरी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजेश विटेकर यांच्या हस्ते संपन्न झाले. या रस्त्यामुळे शेतकरी, शेतमजू
मौजे


परभणी, 4 जानेवारी, (हिं.स.)। पाथरी तालुक्यातील मौजे तारू गव्हाण येथे १ किलोमीटर पांदण रस्त्याच्या खडीकरण कामाचे भूमिपूजन पाथरी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजेश विटेकर यांच्या हस्ते संपन्न झाले.

या रस्त्यामुळे शेतकरी, शेतमजूर व ग्रामस्थांच्या दैनंदिन प्रवासाला मोठा दिलासा मिळणार असून गावाच्या विकासाला नवी दिशा मिळेल. यावेळी उपस्थित ग्रामस्थांशी मनमोकळा संवाद साधत मतदारसंघात सुरू असलेल्या व प्रस्तावित विकास कामांची माहिती दिली.

लोकांच्या गरजा, अपेक्षा आणि विश्वास हाच माझ्या कार्याचा केंद्रबिंदू आहे. सर्वांगीण विकासाच्या ध्यासाने आणि लोकसहभागाच्या बळावर मतदारसंघाच्या प्रगतीसाठी सतत कार्यरत राहण्याचा निर्धार यानिमित्ताने पुन्हा दृढ झाला. यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक, कार्यकर्ते, पदाधिकारी व स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande