ग्रामीण भागात सर्व सोयीसुविधा पुरविणार- आ. संजय बनसोडे
लातूर, 04 जानेवारी (हिं.स.)। शासनाच्या विविध योजना सर्वसामान्य नागरिकांच्या दारापर्यंत पोचवण्यासाठी मी गेल्या अनेक वर्षापासून काम करत आहे. आपला लोकप्रतिनिधी असलो तरी लोकसेवक म्हणूनच आज पर्यंत काम केले आहे. त्यामुळेच मंत्रिपदाच्या काळात मतदारसंघात
ग्रामीण भागात सर्व सोयीसुविधा पुरविणार- आ. संजय बनसोडे


लातूर, 04 जानेवारी (हिं.स.)।

शासनाच्या विविध योजना सर्वसामान्य नागरिकांच्या दारापर्यंत पोचवण्यासाठी मी गेल्या अनेक वर्षापासून काम करत आहे. आपला लोकप्रतिनिधी असलो तरी लोकसेवक म्हणूनच आज पर्यंत काम केले आहे. त्यामुळेच मंत्रिपदाच्या काळात मतदारसंघात विकासाचा डोंगर उभा करून शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांना सर्व सोयीसुविधा पुरविल्या असल्याचे मत माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांनी व्यक्त केले.

तालुक्यातील नागलगाव ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीच्या भूमीपूजन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी गटविकास अधिकारी नरेंद्र मेडेवार, सरपंच सुभाष राठोड, उपसरपंच नेताजी कांबळे, प्रा. श्याम डावळे, शहराध्यक्ष सय्यद जानीमियाँ, कार्याध्यक्ष शशिकांत बनसोडे, नगरसेवक व्यंकट बोईनवाड आदी उपस्थित होते.

आमदार बनसोडे म्हणाले, मतदार संघातील प्रत्येक गावावर माझे लक्ष असल्याने ग्रामीण भागातील रस्ते, वीज, पाणी यासह विविध सभागृहासाठी निधी उपलब्ध करून ग्रामीण भागाचा विकास केला. नागलगाव येथील ग्रामपंचायतच्या इमारत बांधकामासाठी २५ लाख रुपयांचा निधी मंजूर करून नवीन इमारत बांधकाम होत आहे.

भविष्यात सर्वसामान्याला या ग्रामपंचायतीमार्फत सर्व कागदपत्रे व सुविधा पुरविल्या जातील यासाठी निधी अपुरा पडल्यास आणखीन वाढीव निधी देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande