एमपीएससी गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 53 केंद्रावर सुरळीत
कोल्हापूर, 04 जानेवारी (हिं.स.)। महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई यांचेमार्फत आयोजित महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा–2025 ही परीक्षा रविवार, दि. 4 जानेवारी रोजी सकाळी 11 ते 12 या वेळेत एका सत्रात पार पडली. जिल्ह्यातील महाविद
एमपीएससी गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 53 केंद्रावर सुरळीत


कोल्हापूर, 04 जानेवारी (हिं.स.)।

महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई यांचेमार्फत आयोजित महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा–2025 ही परीक्षा रविवार, दि. 4 जानेवारी रोजी सकाळी 11 ते 12 या वेळेत एका सत्रात पार पडली. जिल्ह्यातील महाविद्यालये व हायस्कूलमधील एकूण 53 उपकेंद्रांवर ही लेखी परीक्षा घेण्यात आली.

या परीक्षेसाठी एकूण 16 हजार 313 परीक्षार्थी नोंदणीकृत होते. त्यापैकी 12 हजार 666 परीक्षार्थी उपस्थित, तर 3 हजार 647 परीक्षार्थी अनुपस्थित होते.

परीक्षा कामकाजासाठी जिल्हाधिकारी तथा कोल्हापूर जिल्हा केंद्र प्रमुख, निवासी उपजिल्हाधिकारी तथा परीक्षा नियंत्रक, राज्यकर उपायुक्त, जीएसटी भवन कोल्हापूर (विशेष निरीक्षक) यांच्यासह अभिरक्षक, अतिरिक्त अभिरक्षक, सहाय्यक अभिरक्षक व परीक्षा नियंत्रक सहाय्यक यांची नियुक्ती करण्यात आली होती.

परीक्षा व्यवस्थापनासाठी समन्वय अधिकारी – 14, समवेक्षक – 789, समन्वय सहाय्यक कर्मचारी – 14, लिपिक – 106, भरारी पथक अधिकारी – 3, केटरटेकर – 53, भरारी पथक सहाय्यक कर्मचारी – 3, शिपाई कर्मचारी – 430, उपकेंद्रप्रमुख – 53, जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी – 12 तसेच पर्यवेक्षक – 238 अशी एकूण मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाची नियुक्ती करण्यात आली होती. परीक्षा केंद्रांवर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. प्रत्येक परीक्षार्थीची बायोमेट्रिक पडताळणी व स्क्रीनिंग करण्यात आले. तसेच प्रत्येक परीक्षा कक्षामध्ये CCTV कॅमेरे बसविण्यात आले होते.

शहरातील सर्व 53 परीक्षा केंद्रांवर परीक्षा सुरळीत व शांततेत पार पडली असून कोणताही अनुचित प्रकार किंवा अनियमितता घडलेली नाही, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी तथा परीक्षा नियंत्रक कोल्हापूर गजानन गुरव यांनी दिली.

---------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande