मंगळवेढ्यात आघाडीच्या राजकारणात राजकीय पक्षांची वाताहत
सोलापूर, 04 जानेवारी (हिं.स.)। नगरपालिका निवडणुकीत आघाडीच्या राजकारणात प्रमुख राजकीय पक्षांची वाताहत झाल्याचे स्पष्ट झाले. तर भारतीय जनता पार्टी मात्र आपला जनाधार वाढवण्यात यशस्वी ठरली. नगरपालिका निवडणुकीत स्थानिक आमदार व जिल्हाध्यक्ष एकाच तालुक्य
मंगळवेढ्यात आघाडीच्या राजकारणात राजकीय पक्षांची वाताहत


सोलापूर, 04 जानेवारी (हिं.स.)। नगरपालिका निवडणुकीत आघाडीच्या राजकारणात प्रमुख राजकीय पक्षांची वाताहत झाल्याचे स्पष्ट झाले. तर भारतीय जनता पार्टी मात्र आपला जनाधार वाढवण्यात यशस्वी ठरली.

नगरपालिका निवडणुकीत स्थानिक आमदार व जिल्हाध्यक्ष एकाच तालुक्यातले असल्यामुळे ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची झाली. जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांनी ही निवडणूक पक्षाच्या चिन्हावर लढवण्याची भूमिका दोन महिन्यापूर्वी व्यक्त केली. वीस पैकी नऊ सदस्य भारतीय जनता पार्टीचे व दोन मित्र पक्षाचे सदस्य विजयी झाले.

मागील नगरपालिका निवडणुकीत शिवसेनेबरोबर युतीमध्ये भारतीय जनता पार्टीचे तीन सदस्य होते. त्यामध्ये वाढ झाल्यामुळे जनाधार वाढल्याचे स्पष्ट झाले. अशा परिस्थितीत लोकसभा व विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा तालुक्यात जनाधार वाढवून देखील काँग्रेसने नगरपालिका निवडणुकीत आघाडीच्या राजकारणाला प्राधान्य दिले.

त्यांच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष, शिवसेना देखील त्यामध्ये सहभागी झाली त्याचबरोबर अन्य छोटे पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, मनसे हे देखील सहभागी झाले त्यांना 20 पैकी नऊ जागा मिळाल्या.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande