शहराच्या विकासासाठी आणि सक्षम प्रशासनासाठी भाजपला संधी मिळावी - अतुल सावे
छत्रपती संभाजीनगर, 04 जानेवारी (हिं.स.)। शहराच्या विकासासाठी आणि सक्षम प्रशासनासाठी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन राज्याचे दुग्ध विकास मंत्री भाजप नेते अतुल सावे यांनी यावेळी केले. छत्रपती संभाजी नगर महाप
सावे


छत्रपती संभाजीनगर, 04 जानेवारी (हिं.स.)। शहराच्या विकासासाठी आणि सक्षम प्रशासनासाठी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन राज्याचे दुग्ध विकास मंत्री भाजप नेते अतुल सावे यांनी यावेळी केले.

छत्रपती संभाजी नगर महापालिकेच्या निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. प्रत्यक्ष मतदारांपर्यंत पोहोचण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्र.२३ मधील भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार सुरेखाताई गायकवाड, बाबासाहेब मुंडे, सत्यभामाताई शिंदे व डॉ.प्रमोद राठोड यांच्या प्रचारार्थ बैठक घेऊन नागरिकांशी थेट संवाद साधला.

यावेळी परिसरातील विकास, नागरी सुविधा, मूलभूत सोयीसुविधा आणि नागरिकांच्या अपेक्षांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. प्रभागाचा सर्वांगीण विकास, स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते व सार्वजनिक सुविधांसाठी ठोस भूमिका मांडण्यात आली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande