राज्यमंत्री बोर्डीकर यांनी केला भाजपच्या उमेदवारांचा प्रचार सुरू
परभणी, 04 जानेवारी (हिं.स.)। राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते परभणी महानगरपालिका प्रभाग क्र. ९ येथे भारतीय जनता पार्टीच्या संपर्क कार्यालयांचे उद्घाटन आज करण्यात आले. राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी भाजपाच
राज्यमंत्री


परभणी, 04 जानेवारी (हिं.स.)। राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते परभणी महानगरपालिका प्रभाग क्र. ९ येथे भारतीय जनता पार्टीच्या संपर्क कार्यालयांचे उद्घाटन आज करण्यात आले. राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी भाजपाच्या उमेदवारांच्या प्रचाराला प्रारंभ केला आहे.

भाजपाचे नगरसेवक पदाचे अधिकृत उमेदवार सचिन सुधाकरराव अंबिलवादे, गीता गजानन आंबेकर, सरस्वती फालाजी रेंगे आणि सुनील गुलाबराव देशमुख यांच्या प्रचारार्थ पदयात्रा काढण्यात आली. प्रभागातील नागरिकांनी आपले प्रेम आणि पाठिंबा दर्शवत मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. नागरिकांमध्ये भारतीय जनता पार्टीच्या विजयाचा ठाम विश्वास स्पष्टपणे दिसून आला.

असे राज्यमंत्री बोर्डीकर म्हणाल्या.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande