भास्करराव मुंढे यांनी परभणीभूषण पुरस्काराची रक्कम दिली विज्ञान प्रसारासाठी
परभणी, 04 जानेवारी (हिं.स.)। जिल्ह्याचे भूमिपुत्र तथा सेवानिवृत्त सनदी अधिकारी भास्करराव मुंढे यांना मान्यवरांच्या हस्ते ''परभणीभूषण'' पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या पुरस्काराची मिळालेली रक्कम त्यांनी येथील परभणी ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटीला विज
परभणी


परभणी, 04 जानेवारी (हिं.स.)।

जिल्ह्याचे भूमिपुत्र तथा सेवानिवृत्त सनदी अधिकारी भास्करराव मुंढे यांना मान्यवरांच्या हस्ते 'परभणीभूषण' पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या पुरस्काराची मिळालेली रक्कम त्यांनी येथील परभणी ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटीला विज्ञान प्रसार

कार्यासाठी देत सामाजिक उत्तरदायित्व निभावले आहे.

येथील श्री शिवाजी महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहात आयोजित पुरस्कार वितरण समारंभात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी 'परभणीभूषण' पुरस्कार दिला जातो. यंदा गंगाखेड तालुक्यातील सेलमोहा येथील मूळ रहिवासी असलेले सेवानिवृत्त सनदी अधिकारी भास्करराव मुंढे यांना प्रशासकीय सेवेसाठी कृषितज्ज्ञ विजयअण्णा बोराडे यांच्या हस्ते पुरस्काराने गैरविण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उद्योजक सुनिल रायठठ्ठा हे होते. उद्योजक रायठठ्ठा यांनी आपल्या भाषणात “ डॉ.रामेश्वर नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली परभणी सायन्स सेंटर अतिशय उत्तम काम करत असल्याचे सांगितले. मराठवाड्यात असा वेगळा उपक्रम सुरू आहे. भविष्यासाठी अतिशय महत्वाचा असलेल्या या प्रकल्पाकडे परभणीकरांनी लक्ष द्यावे आणि सहकार्य करावे.” असे आवाहन केले होते. त्यास प्रतिसाद देत भास्करराव मुंढे यांनी पुरस्काराची रक्कम सायन्स सेंटरला विज्ञान प्रसारासाठी दिली. परभणी ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे अध्यक्ष डॉ. रामेश्वर नाईक व सचिव सुधीर सोनूनकर यांनी ही रक्कम स्विकारली. यावेळी सदस्य डॉ .पी. आर. पाटील, डॉ. दिपक मोरे यांची उपस्थिती होती.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परिसरात परभणी सायन्स सेंटरची उभारणी सुरू असून काम प्रगतीपथावर आहे. परभणी ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटीच्या माध्यमातून विज्ञानवारी, खगोलवारी, कार्यशाळा, व्याख्याने, फिरती ‘ विज्ञान वाहिनी’ आदींच्या माध्यमातून महत्वपूर्ण काम केले जात आहे.

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande