रत्नागिरी : खेड तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी राजू चव्हाण
रत्नागिरी, 4 जानेवारी, (हिं. स.) : खेड तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी तरुण भारतचे तालुका प्रतिनिधी राजू चव्हाण यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. खेड पत्रकार संघाची बैठक जिल्हा परिषद विश्रामगृहात झाली. बैठकीत २०२६ साठी संघाच्या नवीन कार्यकारिणी
खेड तालुका पत्रकार संघ


रत्नागिरी, 4 जानेवारी, (हिं. स.) : खेड तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी तरुण भारतचे तालुका प्रतिनिधी राजू चव्हाण यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. खेड पत्रकार संघाची बैठक जिल्हा परिषद विश्रामगृहात झाली. बैठकीत २०२६ साठी संघाच्या नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. माजी अध्यक्ष तथा दैनिक पुढारीचे तालुका प्रतिनिधी अनुज जोशी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. त्यानंतर कार्यकारिणीची निवड झाली.

दैनिक सागरचे ज्येष्ठ प्रतिनिधी किशोर साळवी यांची सचिवपदी, तर उपाध्यक्षपदी दीप वहिनीच्या प्रतिनिधी सौ. अश्विनी वडके आणि दैनिक रत्नागिरी टाइम्सचे इकबाल जमादार यांची निवड करण्यात आली. ज्येष्ठ पत्रकार माझे कोकणचे संपादक, दैनिक सागरचे तालुका प्रतिनिधी सदानंद जंगम आणि ज्येष्ठ पत्रकार विनय माळी यांची कार्यकारिणी सदस्यपदी निवड झाली. संघाचे सल्लागार म्हणून उत्तमकुमार जैन आणि श्रीकांत चाळके काम पाहणार आहेत. संघाचे माजी अध्यक्ष अनुज जोशी संघाचे कार्यक्रम समन्वयक म्हणून कार्यभार सांभाळणार आहेत.

नवनिर्वाचित अध्यक्ष राजू चव्हाण यांनी आगामी काळात विविध सामाजिक व पत्रकारिताविषयक उपक्रम राबवून लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी संघ प्रयत्नशील राहील, असे मनोगत व्यक्त केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande