राजूर गणपती अंगारकी चतुर्थी निमित्ताने दानवेंनी केली पाहणी
छत्रपती संभाजीनगर, 04 जानेवारी (हिं.स.)। राजूर गणपती येथे अंगारकी चतुर्थी निमित्ताने भाजपाचे नेते रावसाहेब दानवे यांनी पाहणी केली. यावेळी अविरतपणे सेवा देणाऱ्या स्वयंसेविकांशी संवाद साधत त्यांचे कार्य जाणून घेतले. महाराष्ट्रातील विविध भागांतून लाख
स्वयंसेविकांशी संवाद साधत त्यांचे कार्य जाणून घेतले.


स्वयंसेविकांशी संवाद साधत त्यांचे कार्य जाणून घेतले.


छत्रपती संभाजीनगर, 04 जानेवारी (हिं.स.)। राजूर गणपती येथे अंगारकी चतुर्थी निमित्ताने भाजपाचे नेते रावसाहेब दानवे यांनी पाहणी केली. यावेळी अविरतपणे सेवा देणाऱ्या स्वयंसेविकांशी संवाद साधत त्यांचे कार्य जाणून घेतले. महाराष्ट्रातील विविध भागांतून लाखो भाविक येणार असल्याने, येणाऱ्या भाविकांना स्वच्छता, पाणी, दर्शन व्यवस्था व सुरक्षिततेसह उत्तम सुविधा कशा देता येतील याबाबत विशेष लक्ष देण्याच्या सूचना दिल्या.

६ जानेवारीला अंगारकी संकष्टी चतुर्थी येत आहे. त्याच्या पार्श्वभूमीवर नियोजनाची बैठक महागणपती संस्थान राजुर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली. अंगारिका चतुर्थीला हजारो भाविक राजूरेश्वराच्या चरणी दर्शनाला येतात त्यांना विविध प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्या करिता सविस्तर चर्चा केली आणि त्याच्या अनुषंगाने सूचना केल्या.

यावेळी तहसीलदार तथा अध्यक्ष गणपती संस्थान राजुर काकडे, कटेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी भोकरदन संजय अहिरे, पोलीस उपनिरीक्षक हसनाबाद तसेच संस्थानचे विश्वस्त, सर्व अधिकारी, कर्मचारी व पत्रकार उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande