
छत्रपती संभाजीनगर, 04 जानेवारी (हिं.स.)। शिवसेना उबाठा गटाचे उपजिल्हाप्रमुख तसेच छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते आनंद तांदूळवाडीकर यांनी आपल्या सहकारी पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला.
भाजपाचे खासदार डॉ. भागवत कराड यांच्यासह छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी भारतीय जनता पार्टी परिवाराच्या वतीने आनंद तांदूळवाडीकर व त्यांच्या सहकाऱ्यांचे मनःपूर्वक स्वागत करण्यात आले.
विकासाभिमुख विचारधारा, मजबूत नेतृत्व आणि जनहितासाठी सातत्याने कार्य करणाऱ्या भारतीय जनता पार्टीवर विश्वास व्यक्त करत त्यांनी पक्षात प्रवेश केला. या प्रवेशामुळे शहरातील भारतीय जनता पार्टीची संघटनात्मक ताकद अधिक बळकट होणार असून, आगामी काळात जनसेवा व विकासाच्या कार्याला नवी दिशा मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
-----------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis