परभणी - स्नेहसंमेलनातील स्पर्धा विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी आवश्यक - मिलिंद सावंत
परभणी, 4 जानेवारी, (हिं.स.)।विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत व व्यक्तिमत्त्व विकासात वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त आयोजित करण्यात येणार्‍या विविध स्पर्धांचा मोलाचा वाटा असतो, असे प्रतिपादन नूतन नगराध्यक्ष मिलिंद सावंत यांनी केले. येथील के. बा.
सेलू


परभणी, 4 जानेवारी, (हिं.स.)।विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत व व्यक्तिमत्त्व विकासात वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त आयोजित करण्यात येणार्‍या विविध स्पर्धांचा मोलाचा वाटा असतो, असे प्रतिपादन नूतन नगराध्यक्ष मिलिंद सावंत यांनी केले.

येथील के. बा. विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांच्या परितोषक वितरण सोहळ्यात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. अनिरुद्ध जोशी होते. प्रमुख अतिथी म्हणून नूतन नगराध्यक्ष मिलिंद सावंत, तर व्यासपीठावर संस्थेचे सचिव व प्रसिद्ध उद्योजक महेशराव खारकर, संस्थेचे सदस्य अ‍ॅड. किशोर जवळेकर, प्रशालेचे मुख्याध्यापक सिद्धार्थ एडके व संजय धारासुरकर उपस्थित होते.

प्रास्ताविकात मुख्याध्यापक सिद्धार्थ एडके यांनी कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करताना वार्षिक स्नेहसंमेलनात घेण्यात आलेल्या विविध स्पर्धा तसेच संस्थेच्या शैक्षणिक प्रगतीची माहिती दिली. यावेळी बोलताना नगराध्यक्ष सावंत म्हणाले की, स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग असेल तरच भविष्यात खरी प्रगती साधता येते. शिक्षकांच्या मार्गदर्शनातूनच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होत असतो. भविष्यात शाळेस आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्‍वासन देत त्यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाचे कौतुक परितोषक वितरण कार्यक्रमात करण्यात येते. अल्पवयीन मुलींवर होणार्‍या दुष्कृत्यांबाबत संस्थेच्या वतीने कठोर उपाययोजना राबविल्या जात असून, यासाठी पालकांनी संस्थेवर विश्‍वास ठेवावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

यानंतर वार्षिक स्नेहसंमेलनात घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांतील यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते परितोषक वितरित करण्यात आले. या वेळी कृष्णा पांचाळ, मंगेश कुलकर्णी व किशोर खारकर यांनी यादी वाचन केले.

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande