
पुणे, 04 जानेवारी (हिं.स.)। 'महापालिकेतील सत्ताधारी, प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे खड्डेमय रस्ते, वाहतूक कोंडी, वाढलेले प्रदूषण, नाट्यगृहांची दुरवस्था, मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्पांची अर्धवट कामे, कचऱ्याची विल्हेवाट व पिण्याचे पाण्याची समस्या, अशा प्रश्नांना सामोरे जाण्याची वेळ पुणेकरांवर आली. पाच वर्षात विकासकामांसाठी ११३० कोटी रुपयांची तरतूद होती, मात्र महापालिकेने त्यापैकी केवळ ८५८ कोटी रुपये खर्च केले, हे कारभाऱ्यांचे अपयश आहे.त्यांच्या निष्क्रियतेमुळेच पुण्याच्या विकासाची गती नऊ वर्षात खुंटली आहे, त्यामुळे आता हे त्रिकुट कारभारी आता बदला' अशा शब्दात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधत महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या शिवाजीनगर येथील कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुभाष जगताप, सुनील टिंगरे, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते विशाल तांबे, आमदार चेतन तुपे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्यासह आरपीआय खरात गटाचे पदाधिकारी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु