
छत्रपती संभाजीनगर, 04 जानेवारी (हिं.स.)। जगदगुरु श्रीमद् रामदासाचार्य नरेंद्रचार्यजी महाराज यांच्या प्रेरणेतून आयोजित रक्तदान महाकुंभ व स्नेहमेळावा तसेच जिल्हा परिषद सर्कल शिवसेना पक्ष मेळावा आज दिगाव येथे अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
यावबेळी बोलताना शिवसेना आमदार संजना जाधव म्हणाल्या की,समाजहिताचा विचार केंद्रस्थानी ठेवत राबविण्यात आलेल्या या रक्तदान महाकुंभाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. रक्तदात्यांनी दाखवलेली सामाजिक बांधिलकी आणि कार्यकर्त्यांमधील आपुलकी पाहून मन भरून आले. तसेच आयोजकांचे देखील कौतुक केले. या स्नेहमेळाव्यात शिवसेनेच्या संघटनात्मक बळकटीवर चर्चा करत आगामी काळातील जनहिताच्या लढ्यासाठी नव्या ऊर्जा व निर्धाराने पुढे जाण्याचा संकल्प करण्यात आला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis