
सोलापूर, 4 जानेवारी (हिं.स.)।
सोलापूरच्या महानगरपालिका निवडणुकीत अनेक राजकीय घडामोडी घडल्या अनेक इच्छुकांना उमेदवारी मिळाली नाही अनपेक्षित अशांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली. अनेकांचा राजकीय गेम सुद्धा करण्यात आला.
निवडणुकीच्या ऐन रंगातच सोलापुरात एमआयएम पक्षाचे शहराध्यक्ष फारूक शाब्दी यांनी आपल्या अध्यक्षपद आणि सदस्य पदाचा राजीनामा देऊन खळबळ उडवून दिली. त्यामुळे या निवडणुकीत एमआयएम पक्षाची कंबर मोडल्याचे दिसून आले.
शाब्दि यांच्या राजीनामे मागे अनेक कारणे आहेत. मुंबईचे शहराध्यक्ष असताना सुद्धा महापालिका उमेदवारीची जबाबदारी वारीस पठाण यांच्याकडे गेली, सोलापुरात सुद्धा शौकत पठाण यांची वाढलेली मध्यस्थी यामुळे नाराज झालेल्या शाब्दी यांनी पद सोडणे पसंद केले असल्याची चर्चा ऐकण्यास मिळत आहे.
शाब्दि पक्ष सोडल्याने अनेक कार्यकर्ते नाराज झाले परंतु काहींना नाइलाजास्तव एमआयएम पक्षाचीच उमेदवारी घ्यावी लागली आहे. फारुख शाब्दी यांचा अतिशय कट्टर समजला जाणारा माजी नगरसेवक गाझी जहागीरदार हा प्रभाग 16 मधून लढवत आहे. या ठिकाणी गाजी जागीरदार याचे कट्टर समर्थक मानले जाणारे कमरुल शेख यांची पत्नी एमआयएम कडून इच्छुक होत्या, त्यांनी उमेदवारी अर्ज सुद्धा भरला होता.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड