
पुणे, 04 जानेवारी (हिं.स.)। उजनी जलाशयातील निळ्या पूररेषेत अतिक्रमण करणाऱ्यावर जलसंपदा विभागाने मोठा फौजफाटा घेऊन अतिक्रमणांवर हतोडा मारला. या कारवाईत सिद्धेश्वर प्लास्टिक कारखानाच उद्ध्वस्त करून टाकण्यात आला आहे.वेळोवेळी अतिक्रमण काढण्याच्या नोटिसा देऊन व गुन्हा दाखल करून देखील त्याला न जुमानता अतिक्रमण काढण्याऐवजी ते वाढविणे सुरूच ठेवण्यात आले होते. यावरून शनिवारी धाडसी कारवाई करण्यात येऊन प्लास्टिक कारखाना भुईसपाट करण्यात आला.
महाराष्ट्र कृष्णा खोरे विभागाचे जलसंपदामंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निर्देशानुसार सोलापूर लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता सु. स. खांडेकर, उजनी धरण व्यवस्थापन विभागाच्या कार्यकारी अभियंता सुचिता डुंबरे, उपविभागीय अभियंता नितीन खाडे व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु