

अमरावती, 04 जानेवारी (हिं.स.)। अमरावती महापालिका निवडणूक प्रचाराचा श्री गणेशा रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रोडशोद्वारे सुरू झालाय. शहरातील पंचवटी चौक येथून दुपारी दोन वाजता खुल्या जीप मधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अमरावतीकरांना अभिवादन करण्यासाठी निघालेत.
प्रत्येक चौकात मुख्यमंत्र्यांचे स्वागत
पंचवटी चौक येथून सुरू झालेला मुख्यमंत्र्यांचा रोड शो हा गाडगे नगर, राठी नगर शेगाव नाका मार्गे विलास नगर, चौधरी चौक, जयस्तंभ चौक , राजकमल चौक, गांधी चौक, भूतेश्वर चौक रवी नगर चौक मार्गे साईनगर पर्यंत झाला. मुख्यमंत्र्यांसोबत खुल्या जीपमध्ये जिल्ह्याच्या माजी खासदार नवनीत राणा, भाजपाचे शहराध्यक्ष डॉ. नितीन धांडे, राज्यसभा सदस्य डॉ. अनिल बोंडे, विधान परिषदेचे माजी सदस्य प्रवीण पोटे,ॲड. प्रशांत देशपांडे सोबत होते. रोड शो दरम्यान मार्गात प्रत्येक चौकात मुख्यमंत्र्यांचा स्वागत करण्यात आलं. प्रत्येक चौकात नागरिकांची गर्दी होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर