
पुणे, 04 जानेवारी (हिं.स.)। तब्बल तीन वर्षांनंतर महापालिका निवडणूका होत असून या निवडणूकांसाठी शहरात सर्वच प्रभागात मोठ्या प्रमाणात इच्छुकांची संख्या अधिक आहे. मात्र, त्या तुलनेत महापालिकेकडून उमेदवारांचे अर्ज, छाननी, अर्ज माघारी घेणे, अंतीम उमेदवार यादी तसेच चिन्ह वाटपासाठी आवश्यक असलेल्या प्रशासकीय यंत्रणेची उभारणी न केल्याने अद्यापही महापालिकेकडे कोणतीही ठोस माहिती नसल्याचे समोर आले आहे.अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतर अंतीम उमेदवारी जाहीर करण्याची मुदत संपली असली तरी, किती अर्ज आले? किती उमेदवारांनी माघार घेतली? एकूण किती उमेदवारांना चिन्ह वाटप झाले, अशी कोणतीही माहिती महापालिकेच्या निवडणूक विभागाला शनिवारी सायंकाळी उशीरा पर्यंत प्रसार माध्यमांना देता आली नाही.धक्कादायक बाब म्हणजे महापालिकेचे निवडणूक विभागाचे उपायुक्त प्रसाद काटकर, अतिरिक्त आयुक्त ओम प्रकार दिवटे, महापालिका निवडणूक प्रमुख आयुक्त नवल किशोर राम यांच्यासह, माध्यम कक्षाची जबाबदारी असलेले उपायुक्त तुषार बाबर यांच्याकडेही ही माहितीनसल्यानेत्यांच्याकडून क्षेत्रीयकार्यालयांच्यानिवडणूक अधिकाऱ्यांकडे बोट दाखविले जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु