
छत्रपती संभाजीनगर, 04 जानेवारी (हिं.स.)। छत्रपती संभाजी नगर महानगरपालिका च्या निवडणुकीच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाचे नेते थेट मतदारापर्यंत आणि नेत्यांपर्यंत पोहोचत आहेत. भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक तथा शहर-जिल्हा उपाध्यक्ष जगदीश सिद्ध यांच्या निवासस्थानी खासदार डॉक्टर कराड यांनी भेट दिली.या भेटीत आगामी महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टी अधिक मजबूत करण्याचा, कार्यकर्त्यांना एकत्र ठेवण्याचा आणि विजयासाठी पूर्ण ताकदीने काम करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
यावेळी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटन, निवडणूक तयारी व आगामी रणनीतीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. स्व. कन्हैयालालजी सिद्ध यांच्या काळापासून सिद्ध परिवार भारतीय जनता पार्टीशी निष्ठेने व ठामपणे जोडलेला आहे. पक्षविचार, संघटनात्मक बांधिलकी आणि कार्यकर्त्यांशी असलेला घनिष्ठ संबंध हा या परिवाराचा राजकीय वारसा राहिला आहे.
-------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis