
छत्रपती संभाजीनगर, 05 जानेवारी (हिं.स.)। आगामी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 च्या अनुषंगाने प्रचाराची दिशा, बूथस्तरीय नियोजन, मतदार संपर्क आणि विजयासाठी आवश्यक असलेल्या विविध रणनीतींबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करून भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकवण्याचा ठाम निर्धार यावेळी व्यक्त केला.
या प्रसंगी, पडेगाव येथे भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 4 मधील अधिकृत उमेदवार कुमारी तन्वी दीपक मुंडले, प्रियांका अनिल वाणी, दीपक बनकर तसेच पुरस्कृत उमेदवार प्रीती अमोल रुईवाले यांच्या प्रचारार्थ प्रभारी, बूथ प्रमुख, मंडळाध्यक्ष व उमेदवार यांची समन्वय बैठक संपन्न झाली.
यानंतर उमेदवार दीपक बनकर व उमेदवार प्रियांका अनिल वाणी यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन भाजपाचे खासदार डॉक्टर भागवत कराड यांच्या हस्ते करण्यात आले.
-------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis