छ. संभाजीनगर : माजी महापौर कलाताई ओझा यांचा भाजपात प्रवेश
छत्रपती संभाजीनगर, 05 जानेवारी (हिं.स.)। छत्रपती संभाजी नगर महानगरपालिकेच्या निवडणुकीला रंगत येत असतानाच माजी महापौर कला तई ओझा यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. यामुळे इतर पक्षांना मोठा धक्का मानला जातो आहे या संदर्भात अधिक माहिती देताना राज
भाजप


छत्रपती संभाजीनगर, 05 जानेवारी (हिं.स.)।

छत्रपती संभाजी नगर महानगरपालिकेच्या निवडणुकीला रंगत येत असतानाच माजी महापौर कला तई ओझा यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. यामुळे इतर पक्षांना मोठा धक्का मानला जातो आहे

या संदर्भात अधिक माहिती देताना राज्याचे मंत्री अतुल सावे यांनी सांगितले की,छत्रपती संभाजीनगर येथील माजी महापौर कलाताई ओझा यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेवर विश्वास व्यक्त करत जाहीर पक्षप्रवेश केला.

मध्यवर्ती प्रचार कार्यालयात पार पडलेल्या या सोहळ्यात त्यांचे मंत्री अतुल सावे आणि खासदार भागवत कराड यांनी मनःपूर्वक स्वागत केले. समाजहित, विकास आणि संघटनात्मक बळकटीसाठी त्यांच्या अनुभवाचा निश्चितच लाभ होणार असून आगामी काळात पक्षाची वाटचाल अधिक सक्षम होईल, असा विश्वास आहे..

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande