प्रहार, काँग्रेस कार्यकर्ते भाजपमध्ये आ. प्रवीण तायडे यांच्या उपस्थितीत प्रवेश
अमरावती, 05 जानेवारी (हिं.स.) तालुक्यातील आसेगाव सर्कलमधील प्रहार व काँग्रेस पक्षांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी आ. प्रवीण तायडे यांच्या सर्वसमावेशक विकासाच्या राजकारणावर विश्वास ठेवत प्रवीण तायडे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला
प्रहार, काँग्रेस कार्यकर्ते भाजपमध्ये आ. प्रवीण तायडे यांच्या उपस्थितीत प्रवेश


अमरावती, 05 जानेवारी (हिं.स.) तालुक्यातील आसेगाव सर्कलमधील प्रहार व काँग्रेस पक्षांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी आ. प्रवीण तायडे यांच्या सर्वसमावेशक विकासाच्या राजकारणावर विश्वास ठेवत प्रवीण तायडे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. ऐन जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांसमोर प्रहार, काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये पक्ष प्रवेश झाल्याने हा पक्ष प्रवेश विशेष मानला जात आहे. केंद्रात व राज्यात सर्वत्र भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रविचाराचे सर्वसमावेशक सरकार असून देशाची विकासाकडे मोठी वाटचाल सुरू आहे. विकासाच्या राजकारणामुळे भारतीय जनता पार्टीला सातत्याने मिळणारा जनाधार पाहता, इतर पक्षातून भाजपामध्ये प्रवेश करणार्‍या नेत्यांचे व कार्यकर्त्यांचे प्रमाण दिवसागणिक वाढतच आहे. याच पृष्ठभूमीवर, आसेगाव सर्कलमधील शेकडो महिला व पुरुष कार्यकर्त्यांनी आ. प्रवीण तायडे यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला आहे. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर भारतीय जनता पार्टीचे हात अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने हा प्रवेश करण्यात आला, असा विश्वास उपस्थित कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. भाजप प्रवेशाच्या कार्यक्रमांमध्ये भाजपचे जिल्हा सचिव नरेश बर्वे प्रामुख्याने उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande