
छत्रपती संभाजीनगर, 05 जानेवारी (हिं.स.)।
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुक निमित्त प्रभाग क्रमांक 23 मध्ये माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली एक मशाल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
छत्रपती संभाजी नगर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार दानवे यांनी सुरू केला आहे त्याचाच एक भाग म्हणून मशाल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते
शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार
सौ. रेखा सुनील जाधव श्री. मनोज चंपालाल बोरा सौ. सुकन्या अजय भोसलेश्री. रवींद्र प्रभाकर गायकवाड यांच्या प्रचारार्थ भव्य व जोशपूर्ण मशाल रॅली मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
शिवसैनिक, पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. शिवसेनेची मशाल, विकासाची दिशा आणि लोकशाहीचा आवाज घराघरात पोहोचवण्याचा निर्धार या रॅलीतून करण्यात आला.
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis