

छत्रपती संभाजीनगर, 05 जानेवारी (हिं.स.)।
मोती माता यात्रेच्या पावन निमित्ताने मराठवाडा, खानदेश व उत्तर महाराष्ट्रातील नामवंत पैलवानांची भव्य कुस्ती स्पर्धा केशवभाऊ राठोड यांच्या नेतृत्वात उत्साहात संपन्न झाली.
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री आई मोती माता यात्रा उत्सव बोरमळी तांडा नागद तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजी नगर येथे संपन्न झाली
कन्नड विधानसभा मतदारसंघाच्या शिवसेनेचे आमदार संजना जाधव याप्रसंगी उपस्थित होत्या त्या म्हणाल्या,या कुस्ती दंगलीत पैलवानांनी दाखवलेली ताकद, शिस्त आणि परंपरेचा सन्मान पाहून ग्रामीण क्रीडा संस्कृतीचे जिवंत दर्शन घडले. अशा उपक्रमांमुळे युवकांमध्ये आरोग्य, व्यायाम आणि स्पर्धात्मक वृत्तीला चालना मिळते. यावेळी आयोजकांचे देखील कौतुक केले. तसेच केलेला सन्मान स्वीकारून आयोजकांचे आणि ग्रामस्थांचे आभार मानले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis