
बदलापूर, ७ जानेवारी (हिं.स.) : येथील खरवई एमआयडीसीत बुधवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास भीषण स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण आहे की 2 ते 3 किलोमीटर अंतरावरून आगीचे लोण दिसत होते. खरवई एमआयडीसीतील पॅसिफिक केमिकल कंपनीत हे स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली.
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार अर्ध्या ते पाऊण तासाच्या अंतरात जवळपास आठ ते दहा स्फोट झाले आहेत. बदलापूर अग्निशमन दलाच्या दोन गाड्या तत्काळ घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. या आगीत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी