जळगाव मार्गे पुण्याकडे धावणाऱ्या झेलम गोवासह काही गाड्यांच्या मार्गात बदल
जळगाव , 07 जानेवारी (हिं.स.) रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. भुसावळ आणि जळगाव मार्गे पुण्याकडे जाणाऱ्या-येणाऱ्या काही रेल्वे गाड्या रद्द करण्यात आले आहे. तर काही गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. खरंतर पुणे रेल्वे विभागातील दौंड-मनमा
जळगाव मार्गे पुण्याकडे धावणाऱ्या झेलम गोवासह काही गाड्यांच्या मार्गात बदल


जळगाव , 07 जानेवारी (हिं.स.) रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. भुसावळ आणि जळगाव मार्गे पुण्याकडे जाणाऱ्या-येणाऱ्या काही रेल्वे गाड्या रद्द करण्यात आले आहे. तर काही गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. खरंतर पुणे रेल्वे विभागातील दौंड-मनमाड लोहमार्गावरील दौंड ते काष्टी स्थानक दरम्यान दुहेरीकरणाचे काम सुरू करण्यात येणार असून यामुळे १५ ते २५ जानेवारी दरम्यान विशेष मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या काळात अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या असून, काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. . यामध्ये भुसावळ, जळगावमार्गे धावणाऱ्या चार रेल्वे गाड्या रद्द करण्यात आले आहे भुसावळमार्गे धावणाऱ्या गाडी क्रमांक १२११३ पुणे-नागपूर गरीब रथ एक्स्प्रेस, १२११४ नागपूर-पुणे गरीब रथ एक्सप्रेस, ११०२५ पुणे-अमरावती एक्स्प्रेस, ११०२६ अमरावती-पुणे एक्स्प्रेस या रेल्वे २३ ते २६ जानेवारी दरम्यान रद्द राहणार आहेत असे कळवले आहे. दरम्यान, काही लांब पल्ल्याच्या गाड्यांना पर्यायी मार्गांवर वळवण्यात आले आहे. यशवंतपूर–चंदीगड, जम्मूतवी–पुणे, हजरत निजामुद्दीन–वास्को-द-गामा या गाड्या मनमाड–इगतपुरी–कल्याण–पनवेल–लोणावळा मार्गे पुण्यात दाखल होतील. मेगाब्लॉक दरम्यान प्रवाशांना गैरसोय होऊ नये, यासाठी रेल्वे प्रशासनाकडून आवश्यक व्यवस्था केल्या जात असल्याचे सांगण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande