मकर संक्रांतीनिमित्त दक्षिण मध्य रेल्वेकडून 150 विशेष गाड्या चालवण्याची घोषणा
नवी दिल्ली , 08 जानेवारी (हिं.स.)।नवीन वर्षाच्या सुरुवातीस मकर संक्रांतीचा सणही जवळ येत आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वेने तयारी पूर्ण केली असून सणाच्या काळात दक्षिण मध्य रेल्वेने 150 विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे. दक्षिण मध्य रेल्वेचे
मकर संक्रांतीनिमित्त दक्षिण मध्य रेल्वेकडून 150 विशेष गाड्या चालवण्याची घोषणा


नवी दिल्ली , 08 जानेवारी (हिं.स.)।नवीन वर्षाच्या सुरुवातीस मकर संक्रांतीचा सणही जवळ येत आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वेने तयारी पूर्ण केली असून सणाच्या काळात दक्षिण मध्य रेल्वेने 150 विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे.

दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ए. श्रीधर यांनी सांगितले की, “आगामी संक्रांती सण लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वेने अनेक विशेष गाड्यांची घोषणा केली आहे. आतापर्यंत सुमारे 150 विशेष गाड्या जाहीर करण्यात आल्या आहेत. या गाड्या प्रामुख्याने दोन्ही तेलुगू राज्यांसाठी असतील.”

ए. श्रीधर यांनी बोलताना पुढे सांगितले की, “भारताच्या उत्तर, पूर्व आणि दक्षिण भागांसाठीही विशेष गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. तिरुपती आणि शिर्डीला जोडणाऱ्या विशेष गाड्यांचाही त्यामध्ये समावेश आहे. सणासुदीच्या हंगामात एकूण 600 हून अधिक गाड्या चालवण्यात येत आहेत. या विशेष गाड्या दक्षिण मध्य रेल्वे अंतर्गत महाराष्ट्रातील काही प्रमुख स्थानकांशीही जोडण्यात आल्या आहेत.”

भारतीय रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली की, या सणाच्या काळात सिकंदराबाद रेल्वे स्थानकावर मोठ्या गर्दीची शक्यता आहे. तसेच, स्थानकावर पुनर्बांधणीचे काम सुरू असल्याने प्रवाशांना काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. ए. श्रीधर यांनी पुढे स्पष्ट केले की, “ही समस्या लक्षात घेऊन काही महत्त्वाच्या गाड्या कायमस्वरूपी सिकंदराबाद रेल्वे स्थानकावरून चारलापल्ली, काचेगुडा किंवा लिंगमपल्ली येथे स्थानांतरित करण्यात आल्या आहेत. तसेच काही गाड्या तात्पुरत्या स्वरूपातही इतर स्थानकांवर हलवण्यात आल्या आहेत.”

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande