मध्यप्रदेश : अपघातात माजी मंत्र्यांच्या मुलीसह तिघांचा मृत्यू
भोपाळ , 09 जानेवारी (हिं.स.)।इंदोरमध्ये एका भरधाव कारची ट्रकला जोरदार धडक होऊन भीषण अपघात घडला आहे. या दुर्घटनेत मध्य प्रदेशचे माजी गृहमंत्री बाला बच्चन यांची कन्या प्रेरणा बच्चनसह तीन जणांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात राल
इंदोरमध्ये भरधाव कार ट्रकला धडकल्याने अपघात; माजी मंत्री बाला बच्चन यांच्या मुलीसह तिघांचा मृत्यू


भोपाळ , 09 जानेवारी (हिं.स.)।इंदोरमध्ये एका भरधाव कारची ट्रकला जोरदार धडक होऊन भीषण अपघात घडला आहे. या दुर्घटनेत मध्य प्रदेशचे माजी गृहमंत्री बाला बच्चन यांची कन्या प्रेरणा बच्चनसह तीन जणांचा मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात रालामंडल परिसरात आज शुक्रवार, ९ जानेवारी रोजी पहाटे सुमारे सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास झाला. कारमधील युवक-युवती पार्टी करून परतत असताना हा अपघात झाला. या अपघातानंतर ट्रकचा चालक फरार झाला आहे. या अपघातात कारमध्ये आणखी एक मुलगी होती, तिला गंभीर जखमी अवस्थेत उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच काँग्रेसचे नेते आणि नातेवाईक घटनास्थळी पोहोचू लागले.

इंदूरमध्ये झालेल्या या अपघातात मध्य प्रदेशचे माजी गृहमंत्री बाला बच्चन यांची कन्या प्रेरणा बच्चन यांच्यासह प्रखर कासलीवाल आणि मान संधू या दोन जणांचा जागीच मृत्यू मृत्यू झाला आहे. या अपघातात अनुष्का राठी नावाची युवती जखमी झाली आहे. धडक इतकी भीषण होती की कारचा पुढील भाग पूर्णपणे चेंदामेंदा झाला आहे.रालामंडल पोलीस ठाण्याने या प्रकरणात गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. अपघातानंतर ट्रकचा चालक वाहनासह घटनास्थळावरून फरार झाला आहे. आरोपी चालकाला लवकरात लवकर अटक करता यावी यासाठी पोलिसांनी शहराच्या बाहेरील मार्गांवर नाकाबंदी केली असून सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे.

या अपघाताची माहिती मिळताच माजी गृहमंत्री बाला बच्चन, त्यांची पत्नी आणि संपूर्ण कुटुंब शवागृहात पोहोचले. प्रेरणा बच्चन यांच्या मृत्यूची बातमी ऐकून संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली आहे. प्रेरणाच्या आईची अवस्था अत्यंत बिकट असून त्या अक्षरशः अश्रूंनी कोसळल्या आहेत. एमवाय रुग्णालयातील पोस्टमार्टम कक्षाबाहेर उभ्या असलेल्या माजी गृहमंत्री बाला बच्चन यांचे दृश्य पाहायला मिळाले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande