भारत मंडपम आंदोलन प्रकरणात आणखी दोघांना अटक
नवी दिल्ली, 23 फेब्रुवारी (हिं.स.)। नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे युवक काँग्रेसच्या आंदोलन प्रकरणात दिल्ली पोलिसांनी आणखी दोन जणांना अटक केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार ही कारवाई आंदोलनाशी संबंधित प्रकरणात करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरो
भारत मंडपम आंदोलन प्रकरणात आणखी दोन जणांना अटक


नवी दिल्ली, 23 फेब्रुवारी (हिं.स.)। नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे युवक काँग्रेसच्या आंदोलन प्रकरणात दिल्ली पोलिसांनी आणखी दोन जणांना अटक केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार ही कारवाई आंदोलनाशी संबंधित प्रकरणात करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची ओळख ३६ वर्षीय अजय कुमार विमल आणि २४ वर्षीय राजा गुर्जर अशी झाली आहे.या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी यापूर्वी चार आंदोलनकर्त्यांना अटक केली होती. तसेच पटियाला हाऊस कोर्ट यांनी इंडियन यूथ काँग्रेसच्या चार कार्यकर्त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

यापूर्वी अटक करण्यात आलेल्या कार्यकर्त्यांमध्ये बिहारचे युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव कृष्ण हरि, बिहारचे इंडियन यूथ काँग्रेस प्रदेश सचिव कुंदन यादव, उत्तर प्रदेशचे इंडियन यूथ काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अजय कुमार आणि तेलंगणाचे नरसिंहा यादव यांचा समावेश आहे. दिल्ली पोलिसांचा आरोप आहे की, आंदोलनकर्त्यांनी कार्यक्रमस्थळी देशविरोधी घोषणा दिल्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आक्षेपार्ह छायाचित्रांसह टी-शर्ट परिधान केले होते.

पोलिसांच्या माहितीनुसार, आंदोलनादरम्यान अडवण्याचा प्रयत्न करताना तीन जण जखमी झाले. पोलिसांनी असेही म्हटले आहे की या आंदोलनामागे कोणतेही कटकारस्थान आहे का, निधीचा स्रोत काय आहे आणि टी-शर्ट कुठे छापण्यात आले, याचा तपास करणे आवश्यक आहे. पोलिसांनी त्यांच्याविरोधात लोकसेवकास अधिकृत कर्तव्य बजावण्यापासून रोखणे, लोकसेवकावर हल्ला करणे, द्वेषपूर्ण भाषण करणे, गुन्हेगारी कट रचणे आदी आरोपांखाली गुन्हा दाखल केला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande