


नवी दिल्ली, 23 फेब्रुवारी (हिं.स.)। राजाजींच्या अर्धपुतळ्याचे अनावरण हे वसाहतवादी प्रभावाचे अवशेष नष्ट करण्याच्या दिशेने टाकलेले आणखी एक महत्त्वाचे पाऊल आहे. भारताला वसाहतवादाच्या प्रभावापासून मुक्त करण्यासाठी सुरू असलेल्या वाटचालीतील एक घटना नाही; तर शासन, कायदा, शिक्षण, संस्कृती आणि राष्ट्रीय अस्मिता या सर्व क्षेत्रात सतत बदल घडवून आणणारी क्रिया आहे, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी केले.
उपराष्ट्रपती राष्ट्रपती भवनामध्ये आयोजित केलेल्या 'राजाजी उत्सव'ला उपस्थित होते. याप्रसंगी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी एडविन लुटियन्स यांच्या पुतळ्याच्या स्थानी सी. राजगोपालाचारी यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण केले.
उपराष्ट्रपतींनी सांगितले की, गुलामी की मानसिकता से मुक्ती चे स्वप्न अनेक उपक्रमांद्वारे कृतीत उतरले आहे; यामध्ये राजभवनांचे लोकभवनांमध्ये रूपांतर; पंतप्रधान कार्यालयाचे सेवातीर्थामध्ये रूपांतर; केंद्रीय सचिवालयाचे ‘कर्तव्य भवन’ असे नामकरण; वसाहतकालीन गुन्हेगारी कायद्यांमध्ये परिवर्तन करणे ; इंडिया गेटजवळ नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा बसवणे; आणि राष्ट्रीय युद्ध स्मारकाचे बांधकाम यांचा समावेश आहे. हे बदल केवळ प्रतीकात्मक नाहीत; ते सरकारच्या सेवाभावाच्या भावनेचे प्रतिबिंब आहेत,असे ते म्हणाले.
एक वकील, स्वातंत्र्य सेनानी, सत्ताकारणी, राजकारणी आणि लेखक म्हणून राजाजींच्या बहुआयामी प्रतिभेवर प्रकाश टाकताना उपराष्ट्रपती म्हणाले की, राजाजी असामान्य प्रतिभेचे धनी होते. त्यांनी नमूद केले की, राजाजींनी सातत्याने आर्थिक स्वातंत्र्याचा पुरस्कार केला आणि भारताचे आर्थिक धोरण स्वतंत्र आणि उदारमतवादी राहिले पाहिजे,असे त्यांना वाटत होते.
आपल्या भाषणाचा समारोप करताना, उपराष्ट्रपतींनी आशा व्यक्त केली की, नागरिकांना मोठ्या जबाबदाऱ्या स्वीकारताना, आपले चारित्र्य उंचावण्यासाठी, तसेच आताच्या काळात त्यांच्या भूमिका विस्तारत असताना त्यांनी केलेल्या दृढनिश्चयांना बळकटी देण्यासाठी आणि राष्ट्राला नेहमीच स्वतःपेक्षा वरचे स्थान देण्यासाठी राजाजींचे जीवन सर्वांना प्रेरणा देत राहील.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule