लेहकडे जाणारे स्पाईसजेटचे विमान तांत्रिक बिघाडामुळे दिल्लीत परतले
नवी दिल्ली , 24 फेब्रुवारी (हिं.स.)।इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे दिल्लीहून लेहकडे जाणाऱ्या उड्डाणाला पुन्हा दिल्लीला परतावे लागल्याची माहिती समोर आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, मंगळवारी सकाळी लेहकडे रवाना झालेल्या स्पाईस जेटच्या विमानाचे दिल्लीलात सु
तांत्रिक बिघाडामुळे लेहकडे जाणारे स्पाईसजेटचे विमान दिल्लीत सुरक्षित परतले


नवी दिल्ली , 24 फेब्रुवारी (हिं.स.)।इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे दिल्लीहून लेहकडे जाणाऱ्या उड्डाणाला पुन्हा दिल्लीला परतावे लागल्याची माहिती समोर आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, मंगळवारी सकाळी लेहकडे रवाना झालेल्या स्पाईस जेटच्या विमानाचे दिल्लीलात सुरक्षित लँडिंग करण्यात आले.

एसजी१२१ या उड्डाणात सुमारे १५० प्रवासी प्रवास करत होते. हे उड्डाण बोईंग कंपनीच्या ७३७ मॉडेल विमानाद्वारे संचलित केले जात होते. आपत्कालीन लँडिंगसंदर्भातील अहवालानुसार, बोईंग ७३७ या विमानात ठिणगी दिसल्यानंतर तातडीने आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. या संदर्भात स्पाइसजेटच्या प्रवक्त्याने सांगितले की, मंगळवारी दिल्ली ते लेह या उड्डाणादरम्यान तांत्रिक बिघाड आढळल्यामुळे विमानाला दिल्लीला परतावे लागले. प्रवक्त्याच्या मते, आपत्कालीन लँडिंगपूर्वी कॉकपिटमध्ये आग लागल्याची कोणतीही सूचना देण्यात आलेली नव्हती. वृत्तानुसार, विमानाचे दिल्ली विमानतळावर सुरक्षित लँडिंग करण्यात आले असून सर्व प्रवासी आणि क्रू सदस्य सुरक्षित आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande