
मेरठ, 24 फेब्रुवारी (हिं.स.) : उत्तरप्रदेशच्या मेरठ जिल्ह्यातील एका घराला लागलेल्या भीषण आगीत 2 महिला आणि 5 मुले गंभीररीत्या होरपळले. सर्व जखमींना मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे 3 मुलांसह 5 जणांना मृत घोषित करण्यात आले. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, रुग्णालयात उपचारादरम्यान आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या आता 6 झाली आहे.
यासंदर्भातील अधिकृत माहितीनुसार किदवई नगर परिसरात इक्बाल अहमद यांचे कुटुंब वास्तव्यास आहे. सोमवारी रात्री कुटुंबातील सर्व सदस्य घरी उपस्थित होते. साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घराला अचानक आग लागली. भुईमजल्यावर असलेले कुटुंबीय बाहेर पडण्यात यशस्वी झाले, मात्र पहिल्या मजल्यावर असलेले सदस्य आत अडकून पडले. पोलिस आणि अग्निशमन दलाच्या पथकाने घराच्या मागील भिंतीला भगदाड पाडून शिडीच्या साहाय्याने अडकलेल्या सात जणांना एकामागोमाग बाहेर काढले. आगीत गंभीररीत्या भाजलेल्या सर्वांना मेडिकल कॉलेज रुग्णालयात हलविण्यात आले, जिथे डॉक्टरांनी 3 मुलांसह 5 जणांना मृत घोषित केले.
----------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी