

बुलढाणा, 25 फेब्रुवारी (हिं.स.) : भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील संत श्री गजानन महाराज समाधीचे दर्शन घेतले. यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण, आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव, संत गजानन महाराज संस्थानचे विश्वस्त निळकंठ शिवशंकर पाटील, हरिहर निळकंठ पाटील यांच्यासह आयुष मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी संत श्री गजानन महाराज संस्थानच्यावतीने राष्ट्रपती श्रीमती मुर्मू यांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले. यानंतर राष्ट्रपती श्रीमती मुर्मू यांनी संत श्री गजानन महाराज यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी मंदीर परिसराची माहिती घेत पाहणी केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी