होळीसाठी वलसाड-दानापूर विशेष गाडी धावणार
जळगाव, 25 फेब्रुवारी, (हिं.स.) - होळी सारखा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून यादरम्यान रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी दिसून येते. याच पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने वलसाड ते दानापूर दरम्यान साप्ताहिक सुपरफास्ट विशेष गाडी चालवण्या
होळीसाठी वलसाड-दानापूर विशेष गाडी धावणार


जळगाव, 25 फेब्रुवारी, (हिं.स.) - होळी सारखा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून यादरम्यान रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी दिसून येते. याच पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने वलसाड ते दानापूर दरम्यान साप्ताहिक सुपरफास्ट विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेतला. या गाडीला भुसावळ येथे थांबा आहे.०९०२५ विशेष साप्ताहिक सुपरफास्ट गाडी दर सोमवारी सकाळी ८.४० वाजता वलसाड येथून सुटेल. दुसऱ्या दिवशी दुपारी १२ वाजता दानापूर येथे पोहोचेल.

परतीची ०९०२६ क्रमांकाची गाडी २४ फेब्रुवारी ते ३१ मार्च दरम्यान दर मंगळवारी दुपारी २.३० वाजता दानापूर येथून सुटून दुसऱ्या दिवशी रात्री ९.३० वाजता वलसाड येथे पोहोचेल.ही गाडी भेस्थान, नंदुरबार, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, पंडित दिनदयाल उपाध्याय, बक्सर आणि आरा या स्थानकांवर थांबेल. होळीच्या काळात प्रवाशांना अतिरिक्त सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी ही विशेष व्यवस्था केल्याची माहिती प्रशासनाने दिली.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande