
अमरावती, 26 फेब्रुवारी (हिं.स.)।
चांदूर बाजार तहसील कार्यालयाच्या परिसरात कृषी सहाय्यक सतीश श्रीकृष्ण निमकर यांना शेतकऱ्यांकडून १ हजाराची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अमरावती यांनी रंगे हात पकडले आहे तक्रारदार शेतकरी यांच्या वडीलांच्या बँक खात्यात कृषी विभाग एकात्मीक फलोत्पादन विकास अभियान योजने अंतर्गत अनुदान रक्कम १७ हजार ९५२ रुपये मिळून देण्यासाठी ही १ हजार रुपयांची लाच कृषी सहाय्यक सतीश ने शेतकऱ्यांकडून मागितली असताच तहसील कार्यालयाच्या परिसरात दुपारी लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले आहे या प्रकरणी चांदुर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला शेतकऱ्यांने या प्रकरणी दी २५ फेब्रुवारी २०२५ रोजी अमरावती येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती पथकाने तक्रारीची पडताळणी केली असता दुपारी चांदूर बाजार तहसील कार्यालयात तक्रारदारा कडून आरोपी कृषी सहाय्यक सतीश निमकर यांनी १ हजारांची लाचेची मागणी करून लाच स्वीकारण्याची तयारी दर्शवली एसीबी पथकाने सापळा रचवत कृषी सहायकास रंगेहात ताब्यात घेतले आहे.
दर्यापुरात लाच लुचपत विभागाची धडक कारवाई
ग्रामसेवकासह दोन जण अटकेत
कान्होली अंतर्गत जनसुविधा २०२४-२०२५ या लेखाशिर्षा अंतर्गत सिमेंट काँक्रेट रस्ता बांधकामाचे काम घेतले होते. सदर काम हे पूर्ण झाले असून त्या कामाचे एकूण ८ लाख रुपये बिलापैकी ३ लाख ८० हजार रुपये हे तक्रारदार यांना प्राप्त आहे. उर्वरीत बिल ४ लाख २० हजार रुपये बाकी असल्याने सदर बिल काढून देण्याकरीता गोपाल देविदास चारथळ (ग्रामविकास अधिकारी ग्रा. पं. कान्होली), पद्माकर साहेबराव राऊत ( ग्रा.पं. सदस्य), मोतीराम गोंडुजी कोल्हे (खाजगी व्यक्ती) यांनी तक्रारदार यांना ४० हजार रुपये लाचेची मागणी केली. सदर तक्रारीवरून लाच प्रतिबंध विभागाने पडताळणी केली असता, उर्वरीत बिल काढून देण्याकरीता तडजोडीअंती ३० हजार लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर करण्यात आलेल्या सापळा कार्यवाही दरम्यान ३० हजार लाचेची रक्कम पद्माकर राऊत व मोतीराम कोल्हे यांनी लक्ष्मी झेरॉक्स सेंटर जवळ स्विकारले. या प्रकरणी तिघांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी