
बीड, 26 फेब्रुवारी (हिं.स.)।
परळी वैजनाथ उपविभागांतर्गत
रिक्त असलेल्या पोलिस पाटील पदभरती प्रक्रियेतील लेखी परीक्षा नुकतीच पार पडली असून, आता पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या मुलाखतींना २६ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. या मुलाखती परळी येथील विशेष अतिथी शासकीय विश्रामगृहात होणार आहेत.
२२ फेब्रुवारी रोजी या पदभरतीसाठी लेखी परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेतून मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी व वेळापत्रक beedpp.recruitonline.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहे. संबंधित पात्र उमेदवारांना त्यांच्या मुलाखतीचा दिनांक आणि वेळ त्यांच्या लॉगइनवरही कळविली आहे. या मुलाखती छत्रपती शिवाजी महाराज चौकातील विशेष अतिथी शासकीय विश्रामगृहाच्या पहिल्या मजल्यावरील हॉलमध्ये घेतल्या जातील.
पात्र उमेदवारांनी संकेतस्थळावर जाऊन वेळापत्रक तपासावे आणि आवश्यक त्या सर्व मूळ कागदपत्रांसह मुलाखतीला वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन परळीचे उपविभागीय अधिकारी तथा पोलिस पाटील पदभरती प्रक्रिया समिती २०२६ चे अध्यक्ष अरविंद लाटकर यांनी तेले भाटे
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis