
बीड, 26 फेब्रुवारी (हिं.स.)।आष्टी तालुक्यातील दौलावडगाव येथे गोपीनाथ गाडे यांच्या बंद घराला भीषण आग लागली. कुटुंब बाहेरगावी असल्याने जीवितहानी टळली असली तरी घरातील सर्व इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे. आगीच्या ज्वाला शेजारील संजय कोहक यांच्या घरापर्यंत पोहोचल्याने त्यांचेही मोठे नुकसान झाले. अहिल्यानगर अग्निशमन दल, अंभोरा पोलीस आणि ग्रामस्थांनी सामूहिक प्रयत्नांतून आग आटोक्यात आणली. अंभोरा पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून आगीचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis