पंतप्रधान मोदी ठरले जगातील सर्वाधिक फॉलोअर्स असलेले नेते
- फॉलोअर्सची संख्या १० कोटींच्या पुढे नवी दिल्ली , 26 फेब्रुवारी (हिं.स.)।पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इन्स्टाग्राम खात्यावरील फॉलोअर्सची संख्या १० कोटींच्या पुढे गेली आहे. ही ऐतिहासिक कामगिरी करणारे नरेंद्र मोदी हे जगातील पहिले नेते ठरले आहेत.
पंतप्रधान मोदी ठरले जगातील सर्वाधिक फॉलोअर्स असलेले नेते


- फॉलोअर्सची संख्या १० कोटींच्या पुढे

नवी दिल्ली , 26 फेब्रुवारी (हिं.स.)।पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इन्स्टाग्राम खात्यावरील फॉलोअर्सची संख्या १० कोटींच्या पुढे गेली आहे. ही ऐतिहासिक कामगिरी करणारे नरेंद्र मोदी हे जगातील पहिले नेते ठरले आहेत. पंतप्रधान मोदी यांनी २०१४ साली इन्स्टाग्राम जॉइन केले होते.

पंतप्रधान मोदींच्या लोकप्रियतेचा अंदाज यावरून येतो की त्यांच्या इन्स्टाग्रामवरील फॉलोअर्सची संख्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या फॉलोअर्सपेक्षा दुपटीहून अधिक आहे. ट्रम्प यांचे इन्स्टाग्रामवर ४.३ कोटी फॉलोअर्स आहेत. तसेच इतर शीर्ष पाच जागतिक नेत्यांच्या एकूण फॉलोअर्सची संख्या देखील मोदींच्या फॉलोअर्सपेक्षा कमी आहे.

इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांचे १.५ कोटी, ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुईझ इनासिओ लुला दा सिल्वा यांचे १.४ कोटी, तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगान यांचे १.१ कोटी, तर अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष जेवियर मिलेई यांचे ६४ लाख फॉलोअर्स आहेत. या सर्व नेत्यांच्या एकत्रित फॉलोअर्सची संख्या देखील मोदींच्या तुलनेत कमी आहे.

भारतीय नेत्यांच्या तुलनेतही पंतप्रधान मोदी खूप आघाडीवर आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे इन्स्टाग्रामवर १.६ कोटी फॉलोअर्स आहेत, तर काँग्रेस नेते राहुल गांधी यांना १.२ कोटी लोक फॉलो करतात.

दरम्यान, पंतप्रधान मोदी सध्या इस्रायल दौऱ्यावर असून बुधवारी त्यांनी इस्रायली संसदेचे संबोधन केले. असे करणारे ते भारताचे पहिले पंतप्रधान ठरले आहेत. इस्रायलच्या संसदेने (नेसेट) त्यांना ‘स्पीकर ऑफ द नेसेट मेडल’ या सर्वोच्च सन्मानाने गौरविले.या भाषणादरम्यान सर्व खासदारांनी उभे राहून त्यांचा गौरव केला. आपल्या भाषणात पंतप्रधान मोदी यांनी इस्रायलचा भारतात मोठा सन्मान असल्याचे नमूद केले. तसेच भारत-इस्रायल संबंध हजारो वर्षांपासूनचे असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी पंतप्रधान मोदी यांना “आशियाई सिंह” असे संबोधले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande