पेंचमधले गिधाड पोहोचले अंजनगावच्या लखाडमध्ये
अमरावती, 26 फेब्रुवारी (हिं.स.) लखाड येथील शिवारात एका झाडावर हा अजस्त्र गिधाड पक्षी स्थानिक नागरिकांना बसलेला दिसला. काही वेळाने तो पक्षी अन्नाच्या शोधात खाली असलेल्या पाण्याच्या साठ्याजवळ आला. परिसरात गिधाड दिसल्याची बातमी वार्यासारखी पसरली आणि
पेंचमधले गिधाड पोहोचले अंजनगावच्या लखाडमध्ये


अमरावती, 26 फेब्रुवारी (हिं.स.)

लखाड येथील शिवारात एका झाडावर हा अजस्त्र गिधाड पक्षी स्थानिक नागरिकांना बसलेला दिसला. काही वेळाने तो पक्षी अन्नाच्या शोधात खाली असलेल्या पाण्याच्या साठ्याजवळ आला. परिसरात गिधाड दिसल्याची बातमी वार्यासारखी पसरली आणि नागरिकांनी त्याला पाहण्यासाठी गर्दी केली. गिधाडाच्या शरीरावरील यंत्रे पाहून नागरिकांनी तातडीने याची माहिती वनविभागाला दिली.

माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक तपासणीत असे समोर आले की, हा पक्षी पेंच वन्यजीव प्रकल्पातील गिधाड संवर्धन केंद्रातून सोडण्यात आला होता. जीपीएस ट्रॅकरमुळे पेंच येथील अधिकार्यांना त्याच्या हालचालींची आधीच माहिती होती. अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या गिधाडाने पेंच येथून प्रवास सुरू केला होता. नरखेड आणि अकोला मार्गे तो अकोट परिसरात पोहोचला. मात्र, परिसरात अन्नाची कमतरता भासल्याने भूकेमुळे तो लखाड येथील झाडावर स्थिरावला होता.परतवाडा येथील वन्यजीव प्राणी दवाखान्याचे डॉ. चंद्रकांत धंदर यांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून गिधाडाची सखोल वैद्यकीय तपासणी केली. तपासणीअंती हा पक्षी पूर्णपणे स्वस्थ असल्याचे त्यांनी घोषित केले. केवळ अन्नाच्या शोधात भटकंती झाल्याने त्याला काहीसा थकवा जाणवत होता. वनपरिक्षेत्र अधिकारी दिनेश वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाच्या पथकाने तातडीने लखाड गाठले. यावेळी वर्तुळ अधिकारी सुधीर हाते, वनरक्षक अंकिता मुंडे व त्यांच्या पथकाने गिधाडाचा रितसर पंचनामा केला आणि पेंच येथील नियंत्रण कक्षाला याची माहिती दिली.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande