अमरावती जिप मुख्यालयातील अंतर्गत रस्ते रखडले
अमरावती, 28 फेब्रुवारी (हिं.स.) जिल्हापरिषदेच्या परिसरातील अंतर्गत रस्त्यांच्या बांधकामाचा मुहूर्त अद्याप निघालेला नाही. मागील पाच ते सहा महिन्यांपासून निविदा प्रक्रिया काढण्यात आली आहे, मात्र अद्यापही या कामाला हात लावण्यात आलेला नाही. जिल्हापरि
जिल्हापरिषद मुख्यालयातील अंतर्गत रस्ते रखडले


जिल्हापरिषद मुख्यालयातील अंतर्गत रस्ते रखडले


अमरावती, 28 फेब्रुवारी (हिं.स.)

जिल्हापरिषदेच्या परिसरातील अंतर्गत रस्त्यांच्या बांधकामाचा मुहूर्त अद्याप निघालेला नाही. मागील पाच ते सहा महिन्यांपासून निविदा प्रक्रिया काढण्यात आली आहे, मात्र अद्यापही या कामाला हात लावण्यात आलेला नाही. जिल्हापरिषदेचे मुख्यालय आयएसओ प्रमाणित असले तरी अंतर्गत रस्ते मात्र ग्रामीण भागातील रस्त्यांप्रमाणेच झालेले आहेत, गेली अनेक वर्षे या रस्त्यांवर कामेच झाली नसल्याने ही दुरवस्था झाली आहे. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह सर्वच विभाग प्रमुख याच रस्त्यांवरून जातात, मात्र निविदा प्रक्रिया झाल्यानंतरही रस्त्यांची कामे सुरू झाली नाही. दुसरीकडे जिल्हापरिषदेच्या विश्रामगृहात तात्पुरती डागडुजी करण्यासाठी लाखो रुपयांची बिले काढण्यात आल्याची चर्चा सुद्धा मिनीमंत्रालयात रंगली आहे. यंदाच्या जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पामध्ये अंतर्गत रस्ते, प्रसाधनगृह तसेच सौंदर्यीकरणासाठी भरीव निधीची तरतूद करण्यात आली होती. मात्र, जिल्हा परिषदेच्या मुख्यालयातील रस्त्यांना आता मंजुरीची प्रतीक्षा लागली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande