
लातूर, 28 फेब्रुवारी (हिं.स.)। : पुढील १८ वर्षांत भारतात हिंदू समाज बहुसंख्येतून अल्पसंख्यांक होईल. ही घडामोड टाळायची असेल, तर हिंदूंनी आता सावध होणे आवश्यक आहे, असा गंभीर इशारा सुदर्शन न्यूजचे संपादक तथा धर्मयोद्धा सुरेश चव्हाणके यांनी दिला.
लातूर तालुक्यातील श्री क्षेत्र खंडापूर येथे सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह व संगीत गाथा पारायण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी हिंदू समाजासमोरील घटत्या जनसंख्येचा प्रश्न अधोरेखित केला. चव्हाणके म्हणाले, सध्या देशातील हिंदूचा लोकसंख्येचा जन्मदर बदलतो आहे. इतर समाजांमध्ये होणारी जनसंख्या वाढ आणि आपल्या हिंदु धर्मात होणारेधर्मांतराचे प्रमाण चिंताजनक आहे. जर हीच परिस्थिती राहिली, तर येत्या १८ वर्षांत हिंदू हिंदू समाजाला समाजाला बहुसंख्याक राहणे कठीण होईल. हा केवळ अंदाज नसून एक वास्तव आहे. त्यांनी हिंदू समाजाला एकत्र येण्याचे आवाहन करतानाच, आपली सांस्कृतिक आणि धार्मिक मूल्ये जपण्याची गरज असल्याचे बजावले. आपण आपल्या पुढच्या पिढीला आपली ओळख देण्यात अपयशी ठरत आहोत. धर्म, संस्कृतीआणि परंपरा यांचे महत्त्व त्यांच्यापर्यंत पोहोचवले नाही, तर हा समाज कालांतराने आपली मूळ अस्मिता गमावून बसेल, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. यावेळी हभप किशोरमहाराज शिवनीकर व हभप किरण महाराज राष्ट्रीय विर योद्धा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष हिंदुसेवक श्रीकांत रांजणकर, प्रदेशाध्यक्ष निळकंठ किल्लारीकर, खंडापूर परिसरातीलमोठ्या संख्येने भाविक आणि हरिनाम सप्ताहात सहभागी झालेले श्रद्धाळू उपस्थित होते. सुरेश चव्हाणके यांच्या या वक्तव्यामुळे उपस्थितांमध्ये विविध चर्चांना उधाण आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis