अमरावती जिल्ह्यात 545 गावांत संभाव्य टंचाई
* चिखलदऱ्यातील 15 गावांचा समावेश 19 कोटी 7 लाखांचा टंचाई निवारणार्थ आराखडा, 722 उपाय योजना प्रस्तावित अमरावती, 28 फेब्रुवारी (हिं.स.) जिल्ह्यात दरवर्षी उन्हाळा सुरू होताच पाणीटंचाईचा प्रश्न उफाळून येतो. यंदाही जिल्ह्यातील ५४५ गावांमध्ये संभाव्य प
जिल्ह्यात 545 गावांत संभाव्य टंचाई; चिखलदऱ्यातील 15 गावांचा समावेश 19 कोटी 7 लाखांचा टंचाई निवारणार्थ आराखडा, 722 उपाय योजना प्रस्तावित


* चिखलदऱ्यातील 15 गावांचा समावेश 19 कोटी 7 लाखांचा टंचाई निवारणार्थ आराखडा, 722 उपाय योजना प्रस्तावित

अमरावती, 28 फेब्रुवारी (हिं.स.)

जिल्ह्यात दरवर्षी उन्हाळा सुरू होताच पाणीटंचाईचा प्रश्न उफाळून येतो. यंदाही जिल्ह्यातील ५४५ गावांमध्ये संभाव्य पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे टंचाई निवारणार्थ जिल्हा परिषदेच्या ग्रामिण पाणी पुरवठा विभागाच्या वतीने १९ कोटी ७ लाख ५५ हजार रुपयांचा कृती आराखडा तयार केला आहे.

टंचाई निवारणार्थ ७२२ उपाय योजना प्रस्तावित असून चिखलदरातील १५ गावांना सर्वाधिक झळ असल्याने तेथे टँकरने पाणी पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

जिल्ह्यात सध्या ५३७ नळयोजना, १,७७२ हातपंप, ३९९ विद्युत पंप, १,१७० सार्वजनिक व २,०५६ खासगी विहिरींचे अधिग्रहन आदी उपाय योजना सुरू आहेत. तर आगामी टंचाई बघता १४ तालुक्यांमध्ये १४३ खासगी विहिरी अधिग्रहित कराव्या लागणार आहेत. याशिवाय प्रशासनाने जलस्त्रोत अधिग्रहण, नळयोजना दुरुस्ती आणि गरजेनुसार टँकरपुरवठा अशा उपाय योजनांचा समावेश करण्यात आला आहे. त्यानुसार १४३ विहिरी अधिग्रहित करण्यात येणार असून २८६ ठिकाणी नळयोजनांची दुरुस्ती प्रस्तावित आहे. सर्वाधिक बाधित तालुक्यांमध्ये चिखलदरा तालुक्यात ८३ व धारणी तालुक्यात ७५ गावांचा समावेश आहे. याकरिता आता ७२२ योजना प्रस्तावित करण्यात आल्या असून जिल्हा प्रशासनाने टंचाई निवारणार्थ १९ कोटी ७ लाख ५५ हजारांच्या खर्चाला मान्यता दिली आहे. त्यामुळे टंचाई निवारणार्थ आता ह्या उपाय योजना राबविण्याकरिता प्रशासन सज्ज झाले आहे.

चिखलदर तालुक्यातील १५ गावांमध्ये टँकरने पाणी पुरवठा चिखलदरा तालुक्यात दरवर्षीच पाणी टंचाईची झळ अधिक प्रमाणात दिसून येते. यंदा देखील तालुक्यात १५ गावांत टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागार आहे. तसेच नियोजन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande