त्र्यंबकेश्वरमधील संदीप फाऊंडेशनमध्ये सार्वजनिक नमाज पठण
Public at Sandeep Foundation
त्र्यंबकेश्वरमधील संदीप फाऊंडेशनमध्ये सार्वजनिक नमाज पठण


त्रंबकेश्वर, 28 फेब्रुवारी (हिं.स.)।

- नाशिक त्रंबक रस्त्यावरील महीरवणी येथील संदीप फाऊंडेशन मध्ये एका वर्गामध्ये सार्वजनिक नमाज पठण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे .या सर्व प्रकरणांमध्ये महाविद्यालयाशी संपर्क साधला असता महाविद्यालय प्रशासनाने कोणतीही भूमिका स्पष्ट केली नसून त्यामुळे या सर्व प्रकरणात आता संशयाचे वातावरण अजूनच वाढले आहे.

नाशिक जिल्हा हा एज्युकेशन हब बनविण्याच्या दृष्टिकोनातून विविध संस्था प्रयत्न करीत आहेत त्यांना यश पण मिळत आहे त्यासाठी वेगवेगळ्या स्तरावरती प्रयत्न सुरू आहे परंतु शुक्रवारी अचानक सोशल मीडियावरती मोठी गोष्ट समोर आली असून यामुळे नासिकला एज्युकेशन हब बनविण्याच्या प्रयत्नांना चांगलाच धक्का लागल्याचे समोर आले आहे.

सध्या मुस्लिम बांधवांचा रमजान महिना सुरू आहे या निमित्याने विशेष नमाज पठण केले जाते नाशिक त्रंबक रस्त्यावरील महीरवणी येथील संदीप फाऊंडेशन महाविद्यालयामध्ये शुक्रवारी एका वर्गामध्ये नमाज पठण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे याबाबत सोशल मीडिया वरती मोठ्या प्रमाणावरती हा व्हिडिओ व्हायरल होत आहे या सर्व प्रकरणाची दखल प्रशासनाने घेतली आहे पण दुसऱ्या बाजूला मात्र या घटनेनंतर महाविद्यालयाच्या आवारात असा प्रकार कसा होऊ शकतो यावरून वेगवेगळ्या चर्चांना देखील सुरुवात झालेली आहे. या सर्व प्रकरणावरती आता वाद सुरू झाली आहे. फाऊंडेशन प्रशासनाची संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रशासनाकडून कोणतीही सकारात्मक उत्तर देण्यात आले नाही त्यामुळे या सर्व प्रकरणावरती संदीप फाऊंडेशनचा सार्वजनिक नमाज पठनाला पाठिंबा होता का असा प्रश्न या निमित्याने समोर येत आहे

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande