नाशिक - भाऊसाहेब हिरे घराण्याच्या महात्मा गांधी शिक्षण संस्थेच्या 28 शाळेवर प्रशासकांची नियुक्ती
नाशिक, 13 मार्च (हिं.स.)। - नाशिक जिल्ह्यामध्ये शैक्षणिक आणि राजकीय मोठी घडामोड झाली असून महाराष्ट्रातील राजकारणामध्ये महत्त्वपूर्ण स्थान असलेले भाऊसाहेब हिरे यांच्या परिवाराच्या असलेल्या महात्मा गांधी विद्यामंदिर या संस्थेच्या 28 शाळांवरती शिक्
नाशिक - भाऊसाहेब हिरे घराण्याच्या महात्मा गांधी शिक्षण संस्थेच्या 28 शाळेवर प्रशासकांची नियुक्ती


नाशिक, 13 मार्च (हिं.स.)।

- नाशिक जिल्ह्यामध्ये शैक्षणिक आणि राजकीय मोठी घडामोड झाली असून महाराष्ट्रातील राजकारणामध्ये महत्त्वपूर्ण स्थान असलेले भाऊसाहेब हिरे यांच्या परिवाराच्या असलेल्या महात्मा गांधी विद्यामंदिर या संस्थेच्या 28 शाळांवरती शिक्षण विभागाने गैरी कारभाराचा थपका ठेवत प्रशासकाची नियुक्ती केली आहे यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका निभावणाऱ्या भाऊसाहेब हिरे यांच्या परिवाराची महात्मा गांधी शिक्षण संस्था असून या संस्थेमध्ये अनेक प्रकारचा गैर कारभार होत असल्याच्या तक्रारी मिळाल्यानंतर या संस्थेची चौकशी करण्यात आली आणि शिक्षण विभागाने शुक्रवारी या संस्थेला मोठा झणका दिला आहेशाळांच्या तपासणीत विद्यार्थ्यांची पटसंख्या आणि प्रत्यक्ष उपस्थिती यात मोठी तफावत आढळली, संच मान्यतेसाठी जास्त विद्यार्थी संख्या दाखवून शिक्षक पदे मंजूर करून घेण्याचा प्रकार घडला, प्रत्यक्ष उपस्थिती कमी असतानाही कागदोपत्री जास्त उपस्थिती दाखवून शालेय पोषण आहार योजनेचा निधी अधिक प्रमाणात पदरात पाडून घेतला. यामुळे शासकीय निधीचा गैरव्यवहार झाल्याचा ठपका चौकशी अहवालात ठेवण्यात आला आहे. काही शिक्षक काम एका शाळेत करीत असताना वेतन दुसऱ्या शाळेतून घेत असल्याचे प्रकारही निदर्शनास आले. तसेच शाळांमधील भौतिक सुविधा, विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि वार्षिक परीक्षांबाबत व्यवस्थापन उदासीन राहिल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

या चौकशीनंतर शिक्षण विभागाकडून शाळा व्यवस्थापनाला कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. त्यानंतर नाशिकच्या उपसंचालक कार्यालयाने या शाळांवर प्रशासक नियुक्त करण्याची शिफारस पुणे येथील शिक्षण संचालकांकडे केली. शिक्षण संचालकांनी याप्रकरणी सर्व शाळांची स्वतंत्र सुनावणी घेतली. या सुनावणीत संस्थाचालक, संबंधित शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षणाधिकारी यांना बाजू मांडण्याची संधी देण्यात आली होती. अंतिम सुनावणीनंतर शिक्षण संचालकांनी २८ शाळांवर प्रशासक नियुक्त करण्याचा आदेश दिला आहे. हा आदेश पदभार स्वीकारल्यापासून तीन वर्षांच्या कालावधीसाठी लागू राहणार आहे.

हिरे कुटुंबीय आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते तथा शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यातील राजकीय हाडवैर सर्वश्रुत आहे. त्यामुळे प्रशासक नियुक्तीसाठी शिक्षण विभागातर्फे सुरू करण्यात आलेली कारवाई राजकीय दबावातून आणि संस्थेवर अन्याय करणारी असल्याचा युक्तिवाद संस्था प्रतिनिधी राजेश शिंदे यांनी शिक्षण संचालक यांच्यापूढे झालेल्या सुनावणीदरम्यान केला होता. दरम्यान, शिक्षण संचालकांनी दिलेल्या आदेशानंतर संस्थेची बाजू जाणून घेण्यासाठी संस्थेचे समन्वयक अपूर्व हिरे यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रतिसाद मिळू शकला नाही.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande