ठाणे - खारटन रोडच्या नामांतरासाठी आत्मदहनाचा इशारा
ठाणे, 15 मार्च (हिं.स.)। खारटन रोडचे चांगो शिंदे मार्ग असा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. मात्र, तो रखडविण्यात आला आहे. येत्या महासभेत हा प्रस्ताव न मांडल्यास आत्मदहन करण्यात येईल, असा इशारा म्युनिसिपल कर्मचारी युनियनचे अध्यक्ष रवींद्र चांगो
ठाणे - खारटन रोडच्या नामांतरासाठी आत्मदहनाचा इशारा


ठाणे, 15 मार्च (हिं.स.)। खारटन रोडचे चांगो शिंदे मार्ग असा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. मात्र, तो रखडविण्यात आला आहे. येत्या महासभेत हा प्रस्ताव न मांडल्यास आत्मदहन करण्यात येईल, असा इशारा म्युनिसिपल कर्मचारी युनियनचे अध्यक्ष रवींद्र चांगो शिंदे यांनी दिला आहे.

खारटन रोड परिसरातील क्रिक रोडला दिवंगत कामगार नेते चांगो शिंदे यांचे नाव देण्याचा प्रस्ताव 10 वर्षांपूर्वी सादर करण्यात आला होता. मात्र, येथील प्रशासनाने हा प्रस्ताव प्रलंबित ठेवला. त्यानंतर अनेक रस्त्यांची नामकरणे करण्यात आली. सर्वात महत्वाचे म्हणजे प्रशासकीय राजवटीतही ही नामकरणे झालेली असताना चांगो शिंदे यांच्या नावाचा प्रस्ताव मंजूर करण्यात आलेला नसून फेरप्रस्तावही दाखल करण्यात येत नाही. त्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात येणार आहे.

येत्या 18 तारखेच्या महासभेत हा प्रस्ताव मांडण्यात न आल्यास आपण महापालिका भवनासमोर आत्मदहन आंदोलन करू असे शिंदे यांनी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande