
अकोला, 15 मार्च, (हिं.स.)। बाळापूर तालुक्यातील मनारखेड येथील रेल्वेगट हे मध्य रेल्वे भुसावल मंडळाचा वतीने एक महिन्याकरिता हे रेल्वे गेट बंद ठेवल्यामुळे त्या मार्गावरील शेतकऱ्यांसह नागरीकांना नाहकचा ञास सहन करावा लागत आहे.
बाळापूर तालुक्यातील मनारखेड रेल्वे गेट हे मध्य रेल्वे भुसावल मंडळाचा वतीने दिनांक 5 मार्च ते 4 एप्रिल पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश काढुन त्या ठिकाणी बंद चे बोर्ड सुध्दा लावण्यात आले असुन परंतु रेल्वे प्रशासनाचा वतीने या मार्गावर पर्यायी व्यवस्था करायला पाहीजे होती.या मनारखेड रेल्वेगेट वरुन श्री.संत गोमाजी महाराज नागझरी कडे रस्ता असुन तसेच कसुरा लोहारा आदीसह गावाकडे जाणाऱ्या रस्ता आहे. तसेच मनारखेड येथील शेतकऱ्याचे शेत सुध्दा या मार्गाने असुन तरी रेल्वे प्रशासना याबाबीचा विचार न करता रेल्वे गेट बंद असल्याचे बोर्ड लावण्यात आले. परंतु या मार्गावर पर्यायी मार्ग काढण्यात यायला पाहिजे होता. तसेच गेल्या दहा दिवसापासुन हा मार्ग बंद असल्याने या मार्गावरील नागरीकांसह शेतकरी वाहनधारक यांना नाहकचा ञास सहन करावा लागत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे