अकोला रेल्वे स्थानक परिसरात नशेखोरांचा धिंगाणा!
अकोला, 15 मार्च (हिं.स.)। अकोल्यातील रेल्वे स्थानक परिसरात भरदिवसाही गर्दुले, मद्यपी रस्त्यावर नशा करून एकमेकांना मारहाण शिवीगाळ करीत असल्यामुळे रेल्वे स्थानकावरील महिला तसेच प्रवाशांना याचा मोठा त्रास होत आहे. हाके भराच्या अंतरावर पोलिस ठाणे असू
Photo


अकोला, 15 मार्च (हिं.स.)।

अकोल्यातील रेल्वे स्थानक परिसरात भरदिवसाही गर्दुले, मद्यपी रस्त्यावर नशा करून एकमेकांना मारहाण शिवीगाळ करीत असल्यामुळे रेल्वे स्थानकावरील महिला तसेच प्रवाशांना याचा मोठा त्रास होत आहे. हाके भराच्या अंतरावर पोलिस ठाणे असूनही येथील सुरक्षा व्यवस्था पूर्णतः कोलमडली आहे..या ठिकाणी मद्यपी, गर्दुल्यांचा उपद्रव वाढत आहे. अगदी पोलिस ठाण्याच्या बाजूलाच हे सर्व प्रकार चालले असताना याकडे पोलिसांचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे.. रेल्वे स्थान परिसरात हे गर्दुले गांजा, अफीम आदी नशा खुलेआम करतात त्यानंतर नशेत एकमेकांना मारहाण करणे शिवीगाळ करणे हे नित्याचेच बनले आहे.. तर याठिकाणी मोठ्या प्रमाणावर हॉटेल्स, देशी व विदेशी दारू दुकाने आणि वाईन शॉप्स उघडण्यात आली आहेत.या दुकानांतून मद्य घेऊन अनेकजण जवळच मोकळ्या भूखंडावर तसेच सार्वजनिक ठिकाणी थांबून नशा करत असतात. या परिसरात मद्याच्या नशेत बडबड, आरडाओरडा करणारे आणि गैरवर्तन करणारे मद्यपींची संख्या वाढली आहे. उघड्यावर सिगारेट फुकत असल्यामुळे मुले आणि मुली सर्रासपणे नशा करताना दिसतात.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande