अकोल्यात पाणी कपात, आता चवथ्या दिवशी पाणीपुरवठा!
अकोला, 13 मार्च (हिं.स.)। अकोला महानगरपालिका पाणी पुरवठा योजनेकरीता मुख्य जलस्त्रोत काटेपूर्णा प्रकल्प (महान) असून आज रोजी प्रकल्पामध्ये 39.049 दलघमी एवढा साठा उपलब्ध असून सद्यस्थितीत तापमानात वाढ होत असून शहरामध्ये तिव्र उन्हाळा जाणवत आहे. तसेच व
अकोल्यात पाणी कपात, आता चवथ्या दिवशी पाणीपुरवठा!


अकोला, 13 मार्च (हिं.स.)।

अकोला महानगरपालिका पाणी पुरवठा योजनेकरीता मुख्य जलस्त्रोत काटेपूर्णा प्रकल्प (महान) असून आज रोजी प्रकल्पामध्ये 39.049 दलघमी एवढा साठा उपलब्ध असून सद्यस्थितीत तापमानात वाढ होत असून शहरामध्ये तिव्र उन्हाळा जाणवत आहे. तसेच वाढते तापमानामुळे पाण्याची मागणी वाढत आहे. यामुळे दिवसेंदिवस धरणातील पाणीसाठ्यामध्ये लाक्षणिक स्वरुपात घट होत आहे. पाण्याची मागणी आणि होत असलेले वाष्पीभवन लक्षात घेता अकोला महानगरपालिका प्रशसनाव्दारा अकोला शहरात 2 दिवसाआड सुरु असलेला पाणी पुरवठा दि. 13 मार्च, 2026 पासून 3 दिवसआड चवथ्या दिवशी करण्यात येत आहे. यामुळे 65 MLD प्लांट वरील महाजनी जलकुंभ, मोठी उमरी, गुडधी जलकुंभ, नेहरु पार्क जलकुंभ, तोष्णीवाल जलकुंभ, आदर्श कॉलनी, जलकुंभ, केशव नगर जलकुंभ, रेल्वे स्टेशन जलकुंभ, गंगा नगर जलकुंभ, अकोट फैल जलकुंभ, जोगळेकर प्लॉट जलकुंभ, लोकमान्य नगर जलकुंभ वरुन होणारा पाणी पुरवठा 3 दिवसआड 4 थे दिवशी करण्यात येणार असल्याबाबतची माहिती पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल डोईफोडे यांनी दिली आहे. तरी शहरातील नागरिकांनी याची नोंद घेऊन मनपा प्रशासनास सहकार्य करावे.

अकोला शहरातील नागरीकांनी पाण्याची पुरेशी साठवणुक करुन पाण्याचा अपव्यय टाळावा असे आवाहन कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा विभाग, मनपा अकोला यांनी केले आहे. यांची सर्व नागरीकांनी नोंद घ्यावी आणि मनपा प्रशासनास सहकार्य करावे, असे आव्हान करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande