
अकोला, 13 मार्च, (हिं.स.)। अकोला शहराची स्वच्छता राख्ण्यासाठी आणि कचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी अकोला महानगरपालिका आयुक्त डॉ.सुनिल लहाने यांच्या आदेशान्वये अकोला महानगरपालिका पुर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण क्षेत्रातील झोन निहाय व्यावसायिक व नागरिकांवर कचरा घंटा गाडीचे वापर न करता परिसरात अस्वच्छता पसरविण्याबाबत मनपा स्वच्छता विभागाव्दारे एकुण रक्कम 18,600/- रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
अकोला महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांनी तसेच व्यावसायिकांनी आपल्या घरात व प्रष्ठिानात निघणारा ओला व सुका कचरा वेग-वेगळा गोळा करून परिसरात किंवा इतरत्र न टाकता फक्त मनपाच्या कचरा घंटा गाडी मध्येच कचरा टाकून आपले परिसर स्वच्छ ठेवावे असे आवाहन अकोला महानगरपालिका प्रशासनाव्दारा करण्यात येत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे